केजरीवाल यांचा मोठा गोप्यस्फोट, बोलले 'भाजप नेत्यांचा आपला छुपा पाठिंबा.' धरमपूर (गुजरात) : गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी भाजपच्याच अनेक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षाला (आप) छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गुजरातमधील वळसाड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केला आहे.

‘‘भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मला येऊन भेटले असून, मी त्यांना या निवडणुकीत ‘आप’साठी छुप्या पद्धतीने काम करण्याचा सल्ला दिला आहे,’’ असे केजरीवाल यांनी सांगितले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना टोमणा मारताना ते म्हणाले, ‘‘केजरीवाल हे चांगले आहेत, पण ते पुढच्या निवडणुकीत जिंकतील,’ असे तुमच्या कानात कोणी सांगितले तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे ओळखून जा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या