औरंगाबाद मध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त !

 



औरंगाबाद : अवैधरित्‍या गुटख्‍याची विक्री करणाऱ्या चौघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली.टाकून गजाआड केले. तर पोलिसांची चाहूल लागताच आरोपींचे दोन साथीदार मोहसिन खान (रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर) आणि अजय गोसावी हे दोघे पसार झाले. अटक आरोपींकडून गुटख्‍यासह २५ लाख एक हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे. ही कारवाई १८ ऑक्‍टोबर रोजी पहाटे नारेगाव कचरापट्टी परिसरात करण्‍यात आली आहे.

शितल बाबुलाल बोहरा (३९, रा. सिंधीकॉलनी), शेख हबीब शेख मदन (३६, रा. मुकुंदवाडी), शेख रियाज फत्तु शेख (२५, रा. अंबिका नगर, मुकुंदवाडी) आणि सुभाष ओंकार जगताप (६५, रा. दौलतनगर,जळगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायादंडाधिकारी एस.व्ही. चरडे यांनी मंगळवारी दि.१८ दिले.

प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्‍याचे सहायक निरीक्षक वामन बापुराव बेले (४३) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, नारेगाव कचरापट्टी परिसरात सुगंधी तंबाखु, गुटख्‍याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार असल्याची माहिती फिर्यादी व त्‍यांच्‍या पथकाला मिळाली होती. माहिती अधारे बेले आणि त्‍यांच्‍या पथकाने रात्री सव्वा अकरा वाजेच्‍या सुमारास नारेगाव कचरापट्टी येथे छापा टाकून वरील चौघा आरोपींना अटक केली. त्‍यांच्‍याकडून चार चाकी वाहने (क्रं. एमएच-१९-झेड-४६५७), (क्रं. एमएच-०२-बीएम-६५०७), (क्रं. एमएच-२०-ईएल-४७४६), (क्रं. एमएच-२०-ईएन-४७३६), गुटखा, मोबाइल, रोख रक्कम असा सुमारे २५ लाख १ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपी शितल बोहरा याच्‍या विरोधात बीडकीन,पैठण, गंगापुर, करमाड, एमाअयाडीसी सिडको,उस्‍मानपुरा, सिडको आणि एमाअयाडीसी वाळुज ठाण्‍यात गुन्‍हे दाखल आहेत तर आरोपी शेख हबीब याच्‍या विरोधात मुकुंदवाडी ठाण्‍यात दोन तर एमआयडीसी सिडको ठाण्‍यात एक गुन्‍हा दाखल आहे. आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.एल. दास यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या