मा.उपसरपंच विकास सावंत यांना पितृशोक..

  


पारनेर: पारनेर तालुक्यातील देवीभोयरे गांवचे माजी उपसरपंच व श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन तसेच कन्हैय्या मल्टीस्टेटचे व्हाॅईस चेअरमन, उद्योजक विकास सावंत यांचे वडील  कै.किसन नामदेव सावंत यांचे रविवार दि.९ आक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजता वयाच्या ८१ व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. किसन सावंत यांनी काबाड कष्ट करत अतिशय हलाखीच्या परीस्थितीमधुन कुटुंबाला स्थिरस्थावर केले.सुरवातीला गावामधे सायकल दुकान चालवले. पुढे मुंबई येथे जावुन फुलांचा धंदा करत मुलांना शिक्षण दिले,चांगले संस्कार केले.त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाची छाया पसरली.त्यांच्या पश्चात पत्नी पारुबाई,दोन मुले सुरेश सावंत प्रगतीशील शेतकरी व मा.उपसरपंच विकास सावंत,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्यामुळे गावासह पंचक्रोशीमधे हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या