अहमदनगर मध्ये बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक ! अहमदनगर : बांधकाम व्यावसायिकास ५० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून ८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शहरात घडली आहे. अशोक शंकर चांदणे (वय ५१, रा. बिशप कॉलनी, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मसद म्युच्युअल निधी लिमिटेड (भिस्तबाग, सावेडी) कंपनीचा व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर धोंडिबा बर्वे, कंपनीचा संचालक चाँदभाई ख्वाजा हुसेन शेख व त्याची पत्नी शबाना चाँदभाई शेख व दलाल मकरंद बोरुडे (रा. माणिकनगर, बुरुडगाव रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अशोक चांदणे यांचा अशोका कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम व विकसनाचा व्यवसाय आहे. त्यांना बांधकाम व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. त्यांना मकरंद बोरुडे याने ५० लाख रुपयांचे बांधकाम कर्ज प्राप्त करून देण्याचे आमिष दाखविले. बोरुडे याने चांदणे यांची बर्वे, शेख दाम्पत्य यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यांनी चांदणे यांना स्टेप अ‍ॅप सेल्फ कन्स्ट्रक्शन लोन या श्रेणीच्या कर्जयोजनेबाबत माहिती दिली. सदर योजनेप्रमाणे २० टक्के रक्कम सुरक्षा अनामत भरल्यास त्वरित कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखविले. चांदणे यांनी ५० लाख रुपये कर्जमंजुरीसाठी नऊ लाख ५० हजार रुपये सुरक्षा अनामत म्हणून दिले. तरीही चांदणे यांना कर्ज मिळाले नाही. अनामत ठेवलेल्या नऊ लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. त्यांना वरील व्यक्तींनी ९० हजार रुपये परत दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या