Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस झाला डबल.



 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे. यापूर्वी म्हणजे काल जेव्हा बोनसची घोषणा झाली, तेव्हा कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस घोषित कऱण्यात आला होता. मात्र त्यावरुन सरकारवर जोरदार टीका होत होती. अडीच हजार रुपये पुरेसे नाहीत, अशी टीका होत असतानाच सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करत नव्याने बोनस जाहीर केला आहे.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments