संप काळात बडतर्फ झालेले एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; जयंत पाटील कडाडले.



 शिंदे-फडणवीस सपकारने शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार निर्णय घेतला आहे. एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे यांचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर सदावर्ते यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर वादाला सुरूवात झाली.

दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 118 हल्लेखोरांचा वकील सदावर्ते यांनी क्रांतीवीर असा उल्लेख केला होता. त्यानंतर शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सिल्व्हर ओकवर ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता.

त्या कर्मचाऱ्यांना सरकारनं पुन्हा कामावर रूजू करून घेतलं आहे. याचा अर्थ त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यासाठी कोणी फुस लावली होती, हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, असं म्हणत माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. एसटीच्या संपावेळी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. घरावर दारूच्या बाटल्या, दगडी फेक केली होती. परंतु पोलिसांना या घटनेची खबर देखील नव्हती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या