'अंधेरी पूर्व निवडणूक मविआ एकत्र लढवणार',अनिल परब कडून मोठी घोषणा.



 मुंबई: शिवसेना कोणाची यावरून सध्या शिंदे गट आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्व निवडणूक मविआ एकत्र लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेत अनिल परब यांनी केली आहे. या निवडणूकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केल्याचे देखील परब यांनी सांगितले. निवडणूकीसाठी गुरुवारी 13 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेले.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, ही पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी लढवण्यात येणार आहे. असे अनिल परब यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राखी जाधव उपस्थित होते.

या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडून उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, असे परब यांनी सांगितले. निवडणूकीसाठी १३ तारखेला सकाळी ११ वाजता नॉमिनेशन दाखल करण्यात येणार आहे, आणि त्यासाठी सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित असतील असेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या