पवार गटाकडून संदीप पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार.

 


मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या येत्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे सर्व उमेदवार निश्चित झाले असून माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. भाजपचे नेते आशीष शेलार यांच्याविरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

यंदा प्रथमच शरद पवार गट तयार करण्यात आला असून अजिंक्य नाईक सचिवपदाचे उमेदवार आहेत,आमदार आशीष शेलार महाडदळकर गटातून पुन्हा एकदा अध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. निवडणूक २० ऑक्टोबर रोजी आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार

संदीप पाटील (अध्यक्ष), नवीन शेट्टी (उपाध्यक्ष), अजिंक्य नाईक (सचिव), गौरव पय्याडे (सहसचिव), जगदीश आचरेकर (खजिनदार),अपेक्स कॉन्सिल सदस्य ः अभय हडप, कौशिक गोडबोले, संदीप विचारे, प्रशांत सावंत, दाऊद पटेल, विग्नेश कदम, राजेश महंत, सुरेंद्र हरमळकर, सुरेंद्र शेवाळे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या