ठाकरे आणि शिंदे गटांच्या मेळाव्यांवर शरद पवारांचं महत्त्वपूर्ण विधान !

  



बुधवारी झालेल्या दसरा मेळावा पार पडला. दोन्ही गटा कडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकी कडे खरी शिवसेना कोणाची वाद चालू असताना कोणाचा मेळावा मोठा होणार या कडे राज्याचं लक्ष्य लागून होते. तर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी उल्लेख केला होता.

त्यावर अनेकांनी प्रतीक्रिया दिल्या आहेत. तसेच मेळाव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले "पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र संघर्षालाही मर्यादा ठेवली पाहिजे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे. ते दुर्देवी आहे.

दसरा मेळाव्यात त्यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नये, ते राज्याच्या दृष्टीने चांगले होणार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही गटाचे कान टोचले आहे. दरम्यान दसरा मेळावा झाला असला तरी उद्धव ठाकरे येत्या ९ तारखेला एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात शिवसेने जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे पुन्हा राजकारण तापणार हे नक्की आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या