पारनेर तालुक्यातील निघोज येथील विविध कार्य.सेवा.सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारन सभा खेळीमेळीत झाली तो क्षण.छाया : दत्ता गाडगे
पारनेर : पारनेर तालुक्यामधे सर्वात मोठी असलेली व शेतकऱ्यांसाठी कामधेनु ठरलेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निघोजची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामधे पार पडली.शेतकर्यासाठी अति महत्वाची असलेली निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच ३१ मार्च ते ३१ आॅगष्ट २०२१ वर्ष ७१ वी अधिमंडळ वार्षिक सभा निघोज येथील श्रीकपिलेश्वर मंगल कार्यालयामधे कन्हैय्या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीमधे संपन्न झाली.
सभेच्या सुरवातीला मळगंगादेवी,संस्थापक किसनराव वराळ पाटील,गबाजी लंके,गबाजी ढवळे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
संस्थेचे सचिव रामदास भोसले यांनी अहवालवाचन केले.तर,सोमनाथ वरखडे व शांताराम कळसकर यांनी सर्व विषयांना मंजूरीसाठीचा ठराव मांडला.आर के वराळ यांनी सर्व विषयांना एकमुखी मंजुरी द्यावी असा ठराव मांंडला.सर्व विषयांवर साधकबाधक चर्चा झाली व सर्व विषयांना सभासदांनी टाळ्या वाजवत मंजूरी दिली.
यावेळी बोलताना चेअरमन सुनिल वराळ म्हणाले,या संस्थेद्वारे नियमित शेतकरी व अल्पभूधारक गरजू सभासदांना धान्य वितरण केले जाते.सभासदांच्या हिताचे निर्णय शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्याचे निराकरण या संस्थेद्वारे होत असते.शेतकरी प्रामुख्याने या संस्थेत मुख्य घटक मानुन आम्ही पदाधिकारी काम करत असतो असे चेअरमन सुनील वराळ यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना सांगीतले.यावेळी वार्षिक अहवाल प्रास्ताविक सादर करून संचालक मंडळाने सर्व विषयांना सुचक अनुमोदन घेत,सभेचे विषयांना उत्तरे दिली.तसेच निघोज विविध कार्यकारी सोसायटी मुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे काम या संस्थेने केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एका प्रकारे आर्थिक स्थार्य प्राप्त झाले असल्याचे गौरव उद्गार सुध्दा निघोज विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील वराळ यांनी काढले. यापुढील संस्थेचे कार्य सर्वांना विश्वासात घेऊन व पारदर्शकता ठेवून संस्थाही पुढच्या पावलावर नेण्याचे उद्दिष्टे ठेऊन काम करणार व शेतकऱ्यांच्या हित जोपासण्यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर राहील.
या संस्थेमध्ये शेतकरी यांना मुबलक शेती पूरक विविध योजना कशा अमलात आणता येईल याकडे सर्वागीण लक्ष केंद्रित करु तसेच सभासदांच्या विश्वासाला कदापी तडा जावु देणार नाही अशी ग्वाही चेअरमन सुनील वराळ यांनी दिली.संस्थेचा आढावा प्रस्तावित करत, ३१ मार्च अखेर संस्थेची प्रगती सभासद संख्या ४७०९ भाग भांडवल २ कोटी ६३ लाख ८७ हजार ६७३, कर्ज वाटप- ११ कोटी २९ लाख ८१ हजार ,संस्थेचा नफा ४७ लाख ८३ हजार ३६२ रुपये असून रोख बँक शिल्लक ९७,११,८५५ रुपये. यावेळी मळगंगा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर कवाद,निघोज नागरी पतसंथेचे चेअरमन वसंत कवाद,संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष ठकाराम लंके,नामदेव थोरात,व्हाईस चेअरमन वसंत काशिनाथ ढवण, बबन तनपुरे ,अनंत वरखडे,सोमनाथ वरखडे,रोहीदास लामखडे,शिवाजी लंके,रुपेश ढवण, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, शांताराम कळसकर, शांताराम कवाद,असिम हवालदार,अमृता रसाळ,रामदास रसाळ, मनिषा वराळ,मंदा ढवळे,कांता लंके,मा.चेअरमन बाळासाहेब गणाजी लमाखडे, संचालक मंडळ दत्तात्रय जयसिंग लंके, संचालक शांताराम देवराम लाळगे, संचालक रामदास सावळेराम रसाळ, संचालक शिवाजी हनुमंत लंके, संचालक संतोष किसन लामखडे, संचालक शांताराम चंद्रकांत कवाद, संचालक हिरामण बळीराम सोनवणे, संचालक असीम इस्माईल हवलदार ,संचालक मंदा अशोक ढवळे, संचालक मनीषा नाना वराळ, संचालक संस्था कर्मचारी वृंद ,उपस्थित ग्रामस्थ निघोज व निघोज परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संखेने हजर होते. आर के भोसले यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या