ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह, आणि शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव !

 



मुंबई: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना नावा वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने आज याबद्दलचा निर्णय दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान अद्याप शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालं नाहीये. आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवा असे शिंदे गटाला सांगण्यात आले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या