यूपी चे मुख्यमंत्री योगीही करणार न्यूयॉर्क-बँकॉकमध्ये 'रोड शो'.



 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. सीएम योगी आणि त्यांच्या टीमची ही भेट परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी असेल. यूपी सरकारने 19 देशांमधील 21 शहरे निश्चित केली आहेत, जिथे योगी आदित्यनाथ आणि त्यांचे मंत्री भेट देतील.

योगी आदित्यनाथ स्वतः न्यूयॉर्क आणि थायलंडसह इतर अनेक शहरांमध्ये रोड शो करणार आहेत. योगी आदित्यनाथ आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री परदेशातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांची आणि सीईओंची भेट घेतील. तसेच त्यांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांमध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांना संबोधित केलं. शिवाय अनेक देशात रोड शो देखील केले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-2023 (UPGIS-2023) चे आयोजन केले आहे. हे समिट 10-12 फेब्रुवारी 2023 रोजी नियोजित आहे. या शिखर परिषदेच्या माध्यमातून राज्यात सुमारे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

योगी आदित्यनाथ 10 नोव्हेंबरला न्यूयॉर्क (अमेरिका), 16 नोव्हेंबरला बँकॉक (थायलंड), 22 नोव्हेंबरला मॉस्को (रशिया) आणि त्यानंतर पोर्ट लुईसला (मॉरिशस) भेट देणार आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाने सॅन फ्रान्सिस्को (यूएसए), टोरंटो (कॅनडा) आणि रिओ दी जानेरो (ब्राझील) येथे वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे, तर दुसरे उपमुख्यमंत्री फ्रान्स, लंडन (यूके) आणि आइंडहोव्हन (नेदरलँड) मध्ये एका संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या