राज्य सरकार दिवाळी सणासाठी शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांनी किराणा सामान देणार आहे. चंद्रपूरमध्ये हे किराणा किट दाखल झाले असून उद्या पासून या किटचं वाटप करण्यात येणार आहेत. या किटमध्ये चार वस्तू देण्यात येणार आहेत.
यामध्ये रवा, पाम तेल, चणाडाळ, आणि साखरेचा समावेश आहे. तर या किटच्या पुड्यावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, तर या किटला आनंदाचा शिधा हे नाव देण्यात आलं आहे. यामुळं आता सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे, मात्र काही ठिकाणी वाटप करण्यासाठी माल आला नाही.
राज्यसरकारच्या बॅग न आल्यामुळे हा माल वाटू नये असं रेशन दुकानधारकांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी उद्या किटचं वाटप होणार आहे. तर काहींना या किटची वाट पहावी लागणार आहे.
0 टिप्पण्या