पंकजा मुंडेंचं आता मिशन दिल्ली.

 



सावरगाव (बीड) : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील सावरगाव येथे दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उसतोड कामगार, गोरगरीब, काबाडकष्ट करणाऱ्या समाजावर चांगले दिवस येऊ दे अशी मागणी करत या लोकांसाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचं सांगितलं. मेळाव्याच्या या भाषणात त्यांनी भाजपचे प्रादेशिक नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नावदेखील घेतले नाही. त्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

या मेळाव्यासाठी खासदार प्रितम मुंडे, खसदार सुजय विखे, आमदार सुरेश धस, शिवाजीराव कर्डिले हे उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी, अटलबिहरी वाजपेयी यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा मी पुढे नेत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं पण आपल्या भाषणात प्रादेशिक नेत्यांचा उल्लेख केला नाही त्यामुळे त्या अजूनही या नेत्यांवर नाराज आहेत का? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, मी २०१९ च्या निवडणुकीत पडल्यानंतर पक्षाकडून मला पद देण्यात यावे अशी अनेकांची अपेक्षा होती. मला संधी न मिळाल्याबद्दल मी नाराज असल्याच्या अनेक चर्चा झाल्या पण मी नाराज नाही, मी पदासाठी नाही तर विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काम काम करत आहे असं त्या आपल्या भाषणात बोलल्या पण त्यांनी आपल्या भाषणात नेत्यांचे नावदेखील न घेतल्यामुळे त्या अजूनही पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याची शंका आहे.

या मेळाव्यासाठी दोन वेळा अमित शाह आले. जे. पी. नड्डा यांनी मला पाठिंबा दिला. ज्या अटलबिहारींना पाहून गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन राजकारणात आले त्यांच्या विचारांचा वारसा मी चालवत आहे असं त्या म्हणाल्या. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा वारसा मी पुढे चालवत आहे असं त्या म्हणाल्या.

२०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांन महाजनादेश काढला होता. राज्याचे मुख्यमंत्री ते होणार होते, पण जेव्हा राज्यात सभा होणार होत्या तेव्हा सभा घेण्यासाठी मी राज्यात फिरले म्हणून मला माझ्या मतदारसंघाला द्यायला वेळ मिळाला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

मला पक्षाने तिकीट दिलंय, मी आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे असं त्या म्हणाल्या. त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे नाव घेतले पण राज्यातील पक्षाचे मुख्य नेते असलेले देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कुणाचाही उल्लेख केला नाही, त्यामुळे पक्षाबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहेत? पक्षाच्या स्थानिक नेत्यांविषयी त्यांच्या मनात नाराजी आहे का? अशा चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या