डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ वर ! नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य आज ७१ पैशांनी घसरलं, त्यामुळं रुपयाचं विक्रमी अवमूल्यनं होऊन तो ८३ रुपयांवर पोहोचला. युकेमध्ये महागाई वाढल्यानं डॉलर जगभरातील विविध देशांतील चलनांच्या तुलनेत मजबूत झाला. सप्टेंबरमध्ये ४० वर्षातील ही सर्वांत मोठी पडझड आहे. यामुळं घराघरातील बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. 

देशाचा ग्राहक किंमत निर्देशांक १०.१ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या महिन्यात ९.९ टक्क्यांवर होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली होती. महागाईचा हा नवा डेटा जुलैमधील उच्चांकावर पोहोचल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सन १९८२ नंतर महागाई सध्या सर्वोच्च स्थानी पाहोचली आहे.

महागाई वाढल्यानं खाद्य पदार्थांच्या किंमतीत वर्षभरात १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन १९८० नंतरची महागाईची ही उच्च झेप असल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं म्हटलं आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड या युकेच्या शिखर बँकेकडून व्याजदरांमध्ये वाढ होऊ शकते.

रुपयाचं आजचं मूल्य हे ८२.२९ रुपये होतं, त्यानंतर त्यामध्ये ७१ पैशांची पडझड झाली. त्यामुळं रुपयाचं आजवरच्या विक्रमी पातळीवर अवमूल्यन झालं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या