पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे.



 बीडः दसऱ्यानिमित्त यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे मेळावे संपन्न होत आहेत. यामध्ये सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथील मेळावा, दुपारी पंकजा मुंडे यांचा सावरगावघाट (बीड) येथील मेळावा, संध्याकाळी शिवाजी पार्कवर होत असलेला उद्धव ठाकरे यांचा मेळावा आणि एकनाथ शिंदे गटाचा मेळावा. दुपारी दीड वाजता संपन्न झालेल्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यातील महत्त्वाचे पाच मुद्दे पाहूया...

1. आपला मेळावा हा चिखल फेकणाऱ्यांचा नसून चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. गोरगरीब कष्टकरी लोकांचा हा मेळावा असल्याचं पंकजा यांनी भाषणाच्या सुरुवातीला नमूद केलं. ''स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधकांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली. परंतु मी कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. कारण ते माझ्या रक्तात नाही.''

2. ''माझ्याकडे तुम्हाला द्यायला खुर्च्या नाहीत. मला तुमची काहीच व्यवस्था करता आलेली नाही. तुम्ही माझ्या आणि मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी इथे आलेला आहात. मी नाराज असल्याच्या बातम्या येतात. पण मी नाराज नाही. तुम्ही जर दसरा मेळाव्याला आला नाहीत तर मग मी नाराज होईन.''

३. सध्याच्या संघर्षाबद्दल बोलतांना पंकजा म्हणाल्या, संघर्षाशिवाय माणसाचं नाव होत नाही. भगवानबाबांनाही खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यातूनच त्यांना भगवानगड स्थापन कारावा लागला. श्रीकृष्णालाही संघर्ष करुन द्वारका स्थापन करावी लागली. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी 40 वर्षे संघर्ष केला. तोच संघर्ष माझ्या रक्तात आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही.

4. ''गर्दी माझी शक्ती आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मला असंच सांगितलं आहे. मी फक्त स्व. गोपीनाथराव मुंडेंचा वारसा चालवत नाही तर मी पंडित दिनदयाळ उपाध्याय, स्व. अटलजींचा, स्व. प्रमोदजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचा वारसा चालवतेय.''

5. ''मी शत्रुविषयी कधीच वाईट बोलत नाही. माझ्याविषयी कुणी काहीही बोललं तरी मी टीका करत नाही. सध्या मी 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. पक्षाने संधी दिली तर लढणारच आहे. परंतु मी कधीही खूर्चीसाठी राजकारण केलेलं नाही, करणार नाही. शिवाय मी कधीच कुणासमोर पदर पसरायला जाणार नाही''.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या