पिंपळगांव तुर्कच्या भानुदास शिंदे यांनी विज्ञान प्रदर्शनात मारली बाजी

 


पारनेर :  राज्य शिक्षण संस्था नागपूर यांच्या आदेशान्वये गणित व पर्यावरण या विषयावर 49 वे वार्ड व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन,शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी आयोजित केले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा होता. मुंबई मधील मुलुंड येथील वामनराव मुरांजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे भानुदास शिंदे यांनी वैज्ञानिक साधनांच्या संकल्पनेतून वर्तुळाची संकल्पना हे मॉडेल या विज्ञान प्रदर्शनात सादर केले. 

वर्तुळाची संकल्पना या शैक्षणिक साहित्याच्या मॉडेलने विद्यार्थ्यांना त्रिज्या व्यास व परीघ सहज सोप्या पद्धतीने कशा प्रकारे शिकवता येईल याचे सादरीकरण भानुदास शिंदे यांनी करून अनेकांचं लक्ष वेधून घेतले. त्यामुळे नाविन्यपूर्ण गणला केलेला हा प्रकल्प उत्कृष्ट वैज्ञानिक साधन म्हणून या प्रदर्शनात निवडला गेला व त्यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले. 

शिक्षण निरीक्षक उर्मिला पारधे यांचे हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शिंदे यांना गौरविण्यात आले. तद्प्रसंगी शिक्षण उपनिरीक्षक संतोष कंठे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे, समूह साधन व्यक्ती उदयकुमार शिंदे, प्रतिभा शिंदे, मुख्य निमंत्रक व सहनिमंत्रक उपस्थित होते. मुलुंडच्या वामनराव मुरांजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयच्या भानुदास शिंदे यांच्या उत्कृष्ट अशा या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच अनेक पारनेरकरांनी त्यांचे अभिनंदन करून शाबासकीची थाप टाकली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या