पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधे मार्गदर्शन करताना चेअरमन शिवाजीराव व्यवहारे व उपस्थित मान्यवर,सभासदछाया : दत्ता गाडगे
पारनेर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची २७ वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय पारनेर येथे संपन्न झाली.
बँकेच्या प्रगतीचा आढावा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी सभेमध्ये दिला ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षा अखेर बँकेला १ कोटी १३ लाख इतका निव्वळ नफा झालेला असून बँकेकडे सध्या ५ कोटी ७५ लाख भाग भांडवल आहे. ९ कोटी ४३ लाख राखीव व इतर निधी १३४ कोटी ठेवी असून ९५ कोटी कर्ज येणे बाकी आहे तर ४६ कोटी गुंतवणूक आहे. बँकेचे चेअरमन शिवाजीराव व्यवहारे व मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी सभासदांचे प्रश्नाला समर्पक उत्तरे दिली सभेचे सूत्रसंचालन बँकेचे सीनियर ऑफिसर रमेश मासाळ यांनी केले तसेच उपस्थित सर्व सभासदांचे आभार संचालक नामदेव काळे यांनी मानले.
या वेळी बँकेचे व्हा.चेअरमन भिमाजी साठे संचालक शिवाजी सुकाळे, नामदेव काळे ,संजय तरटे, बबन दिघे ,संतोष गंधाडे श्रीकांत तोरडमल दत्तात्रय सोले पाटील शांताबाई मापारी उपस्थित होते. सभेमध्ये बँकेचे सभासद सुभाष कावरे, प्रताप गायकवाड, देविदास नगरे, गंगाराम बनसोडे ,फक्कड तरटे, कारभू थोरात ,सत्यवान शिंदे, राजेंद्र जगताप इत्यादी सभासदांनी चर्चत भाग घेतला असल्याची महिती मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिली.
0 टिप्पण्या