शांताबाई सिताराम कापसे यांचे निधन!

 


पाबळ : जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांचे सासुबाई व सौ. सुमन काशिनाथ दाते, आदर्श शिक्षक रखमाजी कापसे सर, नाथा कापसे यांच्या मातोश्री आहेत. त्यांचे सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता अल्पशा आजाराने अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या वय ८९ वर्ष होते. त्यांचा अंत्यविधी रात्री उशीरा ९.३० वा. पाबळ येथे झाला. त्यांना तीन मुले असुन मोठी मुलगी सौ सुमन दाते ह्या सभापती दाते सरांच्या पत्नी आहेत, मुलगा रखमाजी कापसे सर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांची जय मल्हार विद्यालय जांभूत तेथे संपूर्ण सेवा झाली. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे पाबळ गावच्या समाजकारण व राजकारणात मोठा सहभाग त्यांचा असतो. त्यांना अळकुटी परिसरात मानणारा मोठा वर्ग आहे. दुसरा मुलगा पारनेर ग्रामीण पतसंस्थेत वरिष्ठ शाखा अधिकारी पदावर काम करत आहे. आजींचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ, शांत,  प्रेमळ होता. आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आज ज्या उंचीवर त्यांचा परिवार आहे, घर आहे त्यामध्ये त्यांचे कष्ट आहेत. आजीचे राहणीमान साधे असायचे. त्यांच्या मागे ५ नातू व ५ नाती असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने अळकुटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या