आशा, निराशा अन् धन्यवाद... विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बुमराह आणखी काय म्हणाला...

  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळेऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप मधून बाहेर पडला आहे. मात्र विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर पहिल्यांदाच बुमराहचे वक्तव्य समोर आले आहे. वर्ल्ड कपमध्ये न खेळल्याने बुमराह खूपच निराश झाला आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर बुमराहने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपली बाजू मांडली. त्याने चाहत्यांसाठी एक हृदय जिंकणारा संदेश शेअर केला आहे.

बुमराहने मंगळवारी ट्विट केले की, मी खूप दुःखी आहे, कारण यावेळी मी टी-20 विश्वचषकाचा भाग बनलो नाही. पण मला माझ्या प्रियजनांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी बरा होताच, मी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियातील मोहिमेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी सांगितले की, बुमराह आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. जो भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या संभाव्यतेवर नक्कीच परिणाम होईल कारण डेथ ओव्हर्सची गोलंदाजी ही सध्या टीमसाठी सर्वात मोठी चिंता आहे. नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याचा उपचार सुरू आहे. पुढील काही महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही हे निश्चित होते. पाठदुखीमुळे बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेतून बाहेर व्हावे लागले.

बीसीसीआयने अद्याप बुमराहच्या जागी कोणत्याही खेळाडूची निवड केलेली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोनामधून बरा झाल्यानंतर त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. जर शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यापैकी एकाला विश्वचषक संघात स्थान मिळू शकते. भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या