Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकांवरून मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना इशारा ! मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, या निवडणुकीत शिंदे गटाचे २४२ सरपंच निवडूण आले आहेत, आज ठाणे पालघर जिल्ह्यातील विजयी सरपंचांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान 'अभी तो यह झॉंकी है, पिक्चर अभी बाकी है' अश शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना इशार दिली आहे. ते ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सदस्यांशी संवाद साधत होते.

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणूक ही झॉंकी आहे, पिक्चर अभी बाकी है, खोका-खोका म्हणणाऱ्यांना मतदारांनी चांगला धक्का दिला आहे. यामधून त्यांनी बोध घ्यावा, असे आवाहन विरोधकांना केले आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपने घेतलेल्या माघारीबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शरद पवार, राज ठाकेर यासोबतच प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं, उमेदवारानेही विनंती केली. त्यानंतर भाजपने मोठं मन दाखवून भाजप-सेना उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली, असं असून देखील चांगलं म्हणण्याचं औदार्य दाखवलं नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील जनता सुज्ञ आहे, भाजप आणि सेनेनं युती करत निवडणूक लढवली आणि जनतेने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला, आमची भूमिका आता लोकमान्य झाली आहे. म्हणूनच हे चित्र आपल्याला पाहायाला मिळतं असे मुख्यमंत्री म्हणाले.


Post a Comment

0 Comments