मुंबई : शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कुणाला मिळणार? यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार होती. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने ८०० पानांचा ई रिप्लाय आज निवडणूक आयोगाला सादर केला आहे. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला रिप्लाय सादर करून ही माहिती माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आज प्रत्यक्षात भेटून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत. तर एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचं सांगत आहे. त्यामुळं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.
ठाकरे गटाने काल १८० प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावत आज २ वाजेपर्यत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. त्यानुसार ठाकरे गटाने आज ८०० पानांचा इ रिप्लाय निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष आहे.
0 टिप्पण्या