मेसेज येईना का जाईना...व्हॉट्स अॅपची सेवा ठप्प? युजर्समध्ये गोंधळ
मोबाइल धारकांसाठी अत्यावश्यक असलेली मेसेंजर सेवा व्हॉट्स अॅपची सेवा ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत आहे. मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र, सेवा पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर चा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्स अॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सुरुवातीला, व्हॉट्स अॅपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदान-प्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या.
अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्स अॅपचा वापर करतात. व्हॉट्स अॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्हॉट्स अॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सचा त्याचा फटका बसला आहे.
0 टिप्पण्या