मोटार सायकल चोरांच्या टोळीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या


पारनेर पोलीसांची दमदार कारवाई...

८ मोटरसायकल ताब्यात...

पारनेर : - मागील अनेक दिवसांपासुन पारनेर तालुक्यामधे मोटारसायकल चोरांनी अक्षरश: धुमाकुळ घातला होता. याविषयीच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या.या मोटरसायकल चोरांच्या शोधार्थ पारनेर पोलीसांनी कंबर कसली होती. मात्र आता या कारवाईला मोठे यश येताना दिसुन येत आहे. तशी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व पारनेर पोलीसांची टिम या विषयी अलर्ट होतीच.अखेर पोलीसांच्या या प्रयत्नाला यश आले.पारनेर पोलीसांनी दमदार कारवाई करत मोटार सायकल चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळत तब्बल ८ मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत.पारनेर पोलुसांची हि मोठी कारवाई मानली जात आहे.

     सदर हकीगत अशी,दिनांक ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पारनेर तालुक्यातील बागमळा,पळशी, येथुन अज्ञात चोरटयाने बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल चोरुन घेवुन गेल्याची तक्रार तक्रारदार बाळासाहेब बापू पठारे रा. बागमळा पळशी ता. पारनेर जि.अहमदनगर यांनी दिली होती. त्यांचे फिर्यादीवरुन पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ८२३/२०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचे तपासामधे  पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पारनेर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार यांनी सदर प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करुन गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्हयातील आरोपी अर्जुन साहेबराव जाधव व इतर दोन विधीसंघर्षीत बालकांना स्थानिकांच्या मदतीने नमुद आरोपी व विधीसंघर्षीत बालक हे चोरलेल्या ०३ मोटार सायकल खोलण्याचे प्रयत्नात असतांनाच त्यांना ताब्यात घेत, त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, अर्जुन जाधव याने  सुरवातीला माहीती देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र त्याला अधिक विश्वासात घेत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने व त्याचे साथीदार यांचे ताब्यात मिळालेल्या मोटार सायकल हया चोरीच्या असल्याची कबुली दिली.आणि  सदर गुन्हा हा त्याचे साथीदार नितीन सुनिल काळे रा.ठाकरवाडी, वनकुटे ता. पारनेर जि.अहमदनगर व इतर दोन विधीसंघर्षीत बालकांनी केला असल्याचे सांगीतले.नमुद आरोपीताची मा. न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी ०५ मोटार सायकल काढुन दिल्या अशा,तब्बल २,३०,०००/- रुपये कि.च्या ८ मोटार सायकल आरोपीने काढुन दिल्याने, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलमधे,

मोटारसायकल बजाज प्लॅटीना क्र.एम एच १६ सीटी ०६२७,बजाज प्लॅटीना क्र.एम एच १७ ए टी ३०३५,बजाज पल्सर क्र.एम एच १२ एस पी १०३२,हिरो स्प्लेंडर प्लस क्र.एम एच ०२ जी ७११४,हिरो होंडा पॅशन प्रो क्र. एम एच बारा इ आर ३०४,बजाज डिस्कवर विना क्रमांक,हिरो पॅशन प्रो विना क्रमांक,बजाज पल्सर क्र. एम एच १२ पी पी ९७४८ अशा एकुण ८ मोटरसायकल पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.दरम्यान तपासाअंती अजुनही गाड्यांचा शोध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सदर गुन्हयाचे तपास कामी अदयाप पावेतो १ अर्जुन साहेबराव जाधव वयवर्ष २३ वर्ष रा. चिपाचीवाडी, चिंचाळे ता.राहुरी जि. अहमदगर यास अटक करण्यात आली असुन, २. नितीन सुनिल काळे वय १९ वर्ष रा. ठाकरवाडी, वनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर यास ताब्यात घेण्यात आले आहे. ३. दोन विधीसंघर्षीत बालकांचे वयाची खात्री करुन त्यांना तात्काळ पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.तपासा दरम्यान आरोपींकडुन बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


पोलीसांनी केलेली दमदार व उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक रोकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम,नगर ग्रामीणचे उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक घनशाम बळप,नेम पारनेर पोलीस स्टेशन यांचे सुचना व मार्गदर्शना खाली, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस पोलीस हेड काॅन्स्टेबल संदिप गायकवाड, पोलीस नाईक सुधीर खाडे, राम मोरे, गहिनाथ यादव, पोलीस काॅन्स्टेबल  सुरज कदम, श्रीनाथ गवळी, विवेक दळवी, रविंद्र साठे, सचिन लोळगे, यांचे पथकाने केली आहे.

यावेळी बोलताना पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप म्हणाले,यापुढील काळामधे कुणीही जुन्या गाड्या खरेदी करताना अगोदर कागदपत्र तपासुनच गाड्यांची खरेदी करावी अन्यत: आपली फसवणुक होवु शकते असे सांगीतले.

दरम्यान पारनेर पोलीसांनी केलेल्या या दमदार कारवाईमुळे सर्वत्र पोलीसांचे कौतुक होताना दिसत आहे.


छाया : दत्ता गाडगेछा

याचित्रामधे आरोपींसह पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप,उपनिरीक्षक हनुमान उगले व पारनेर पोलीसांचे पथक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या