राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन
पुणे:
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंथन वेध भविष्याचा असे राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिबिराला नाव दिले आहे.
नोव्हेंबरमधील 4 आणि 5 या तारखेला अभ्यास शिबिर आयोजित केले आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना भविष्याचे आकलन व्हावं यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे. या शिबिराला 1750 पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलावण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, 2019 मध्ये विधानसभेला आणि राज्यसभेला उमेदवार होते त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील आमदार, खासदार, निवड केलेले प्रवक्ते, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अभ्यास शिबिराच्या दरम्यान प्रभावी नेते भाषण करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.
शिर्डी येथील ठाकूर कॉम्प्लेक्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.
याशिवाय, मधुकर भावे. जागतिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था जे एफ पाटील, सामाजिक न्याय धनंजय मुंडे, बहूजन हिताय एकनाथ खडसे, भाषण करणार आहेत.असे अजित पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षण छगन भुजबळ, डीजीटल मिडीया संजय आवटे अशा विविध विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
0 टिप्पण्या