SBI, HDFC आणि ICICI बँकांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. बँक ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेसाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या गरजेनुसार बँकिंग व्यवस्था अधिक सोपी करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले आहेत. बँकांनी ग्राहकांच्या सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून कर्जदारांसाठी बँकेची प्रक्रिया सुलभ करता येईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांना कर्ज देण्याच्या नियमांमध्ये लवचिकता ठेवण्याची सूचना केली आहे. उद्योग प्रतिनिधी आणि अर्थमंत्री यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अर्थमंत्र्यांनी ही विशेष सूचना केली. हा सल्ला बँकांनी पाळावा, असे अर्थमंत्र्यांनी बँकांना सांगितले. याचा फायदा SBI, HDFC, ICICI सह सर्व बँकांच्या ग्राहकांना होणार आहे. यावर एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले की, स्टार्टअपसाठी मोठी गुंतवणुक करावी लागते. त्यासाठी पैशांची उपलब्धता नसते. पैशांची उपलब्धता नसणे ही स्टार्टअपसाठीची सर्वात मोठी चिंता आहे. या बैठकीत इतर बँकांच्या अध्यक्षांनीही  स्वतःची बाजू मांडली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,  बँकांनी अधिकाधिक ग्राहक अनुकूल बनण्याची गरज आहे. परंतु जास्त जोखीम घेण्याइतपत ते नसावे. परंतु बँकांनी ग्राहकांची सोय लक्षात घेऊन अधिकाधिक मैत्रीपूर्ण वागणे आवश्यक आहे. यावर दिनेश खारा म्हणाले की, ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेत डिजिटलायझेशनची प्रक्रिया वाढत आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंग संबंधित समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. सध्या बँकांनी डिजिटलायझेशनमुळे अनेक प्रकारच्या सुविधांचा समावेश केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या