BCCI ने बांगलादेश आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर हार्दिक पांड्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार असणार आहे.
समितीने बांगलादेशविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले आहे. दोन्ही देशांच्या मालिकांसाठी संघात काही नव्या खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. उमरान मलिका आणि शाहबाज अहमद यांना संघात संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 साठी भारतीय संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ : शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
असा आहे न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला T20 - 18 नोव्हेंबर
दूसरा T20 - 20 नोव्हेंबर
तिसरा T20 - 22 नोव्हेंबर
पहिली वनडे - 25 नोव्हेंबर
दुसरी वनडे - 27 नोव्हेंबर
तिसरी वनडे - 30 नोव्हेंबर
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव.
0 टिप्पण्या