मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित संकल्प अकॅडमी बुऱ्हानगर व वंडरलॅण्ड प्री स्कूल आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद 2000 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग




नगर -
बाल वयातच विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील धडे देणे गरजेचे आहे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ समाविष्ट करण्यात आलेले आहे आजच्या विद्यार्थ्याला विविध क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून मेहनतीच्या व चिकाटीच्या जोरावर आपले यश संपादित करावे शालेय क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळत असते मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नगर शहरातील विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून व्यासपीठ निर्माण करून दिले आहे स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळत असतो. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण होते याचबरोबर त्याचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. असे प्रतिपादन अक्षय कर्डिले यांनी केले.

          मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित संकल्प अकॅडमी बुऱ्हानगर व वंडरलॅण्ड प्री स्कूल यांच्यावतीने बुऱ्हानगर येथे विद्यार्थ्यांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अक्षय कर्डिले, अंकुर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे, संकल्प अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सारिका भापकर, सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप भोर, शेखर उंडे, यश ग्रुपचे गाडे, ऊर्जा गुरुकुलच्या संचालिका कल्याणी फिरोदिया, छाया खर्डे, अनुराधा कांबळे, विद्या दाभाडे, सागर कायगावकर, प्रिया नागपाल, राजेंद्र पाचे, साहिल दोडेजा, चंद्रशेखर मुळे, अविनाश विधाते

आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी अंकुर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे म्हणाले की, मुळा एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ यशवंतराव गडाख व शाळेच्या संचालिका सौ. निलांगी ताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील सुमारे दोन हजार मुला - मुलींनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा सहा ते नऊ वयोगट यांच्यासाठी दीड किलोमीटर धावण्यासाठी चे अंतर ठेवण्यात आले होते तेसेच दहा ते तेरा व चौदा ते सोळा या वयोगटातील विद्यार्थ्यांना धावण्यासाठी तीन किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पाडली मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अनेक वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली या स्पर्धेमध्ये पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह,गोल्ड मेडल व शालेय साहित्याचे बक्षीस तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या २००० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.केडगाव येथील सरस्वती महाविद्यालयाचे सुमारे १५२ विद्यार्थी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते असे ते म्हणाले.

          संकल्प अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सारिका भुतकर म्हणाल्या की विद्यार्थ्यांना बाल वयातच क्रीडा क्षेत्राची ओळख व्हावी यासाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक यश ग्रुप ग्रुपचे संचालक शशिकांत गाडे सर तसेच योगीराज गाडे , व शंभूराजे गाडे यांच्या कडून देण्यात आले त्यांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले स्पर्धेमध्ये सहा ते नऊ वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक अक्षय घाईतडक, दृतीय क्रमांक संग्राम काकडे, तृतीय क्रमांक निरंजन काळे तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक अनिता हिकर, दृतीय भाग्यश्री जोशी, तृतीय सायली वाघस्कर आदींना सन्मानित करण्यात आले. दहा ते तेरा वयोगटातील मुलांमध्ये सर्वेश दळवी, दृतीय हर्षल भोसले, तृतीय प्रेम गर्जे तसेच मुलींमध्ये प्रथम वैभवी खेडक, तृतीय शैयी बेरड, तृतीय समीक्षा भालेराव यांना सन्मानित करण्यात आले याचबरोबर चौदा ते सोळा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये प्रथम अभिषेक बनकर, दृतीय कुवर सिंग, तृतीय अंकुश प्रजापती तसेच मुलींमध्ये प्रथम वैशाली खेडकर, दृतीत सिवरण चव्हाण, तृतीय माहेश्वरी पराठे आदींसह खेळाडूंना रोख रक्कम, गोल्ड मेडल, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. असे त्या म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या