ज्ञानदेवचा मृत्यु 50 फुटावर होता....

आश्वी परिसरात बिबट्याचे दर्शन हे रोजचेच


शिबलापूर : आश्वी परिसरात बिबट्याचे दर्शन हे रोजचेच झाले आहे. नुकतेच प्रिंप्री शिवारात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच 17 नोव्हेंबर (गुरुवार) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास रोहित आण्णासाहेब नागरे आश्वी वरून येत असताना त्याच्या गाडीसमोर आणि ज्ञानदेव गंगाराम नागरे यांच्या घरापासून 150-200 फुट अंतरावर रस्त्यावर सुमारे 10-15 मिनिटे बिबट्या उभा होता.   रोहित बरोबर 3 वर्षाची चुलत बहीण (धनश्री), 5 वर्षांचा चुलत भाऊ (प्रथमेश) व आजी (यमुना ज्ञानदेव नागरे) हे देखील होते. तसेच त्यापासून 50 फुट अंतरावर प्रवीण ज्ञानदेव नागरे हा तरुण गायांसाठी चारा काढत होता. त्याला तर कल्पनाही नव्हती कि त्याच्यापासून 50 फुट अंतरावर बर्‍याच वेळापासून बिबट्या आहे. त्याने त्यावर कधीहीं हल्ला केला असता. तसेच दिवाळीच्या आदल्यादिवशी दुपारी 1 वाजता नागरे कुटुंबियांच्या जवळच राहणार्‍या अर्जुन गणपत गिते यांचा बोकड बिबट्याने ठार मारला आणि उचलून उसात घेऊन गेला. त्यामुळे अशाप्रकारे दिवसाढवळ्या बिबट्या आजूबाजूला वावरत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या