राहुरी : तालुक्यातील टाकळीमिया येथे आज सायंकाळी सहा वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची भव्य ऊस परिषद होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले
दरम्यान प्रमुख मागण्यांमध्ये राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत घेऊन शेतीपंपाचे भारनियमन रद्द करून विना कपात दिवसा बारा तास वीज मिळावी व कारखानदारीने काटामारी थांबून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी व ऑनलाइन काटे नियंत्रित प्रणाली विकसित करून चोरून होत असल्याने रिकवरी थांबून शेतकऱ्यांची लूट थांबवावी आजच्या विविध मागण्या या शेतकऱ्यांच्या ऊस परिषदेत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहे यावेळी राज्य सरकार सह कारखानदाऱ्यांना ते काय इशारा देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात एफ आर पी मिळावा म्हणून अनेक आंदोलने त्यांनी केलेली आहे त्यामुळे या आंदोलनाचा सरकारला विचार करावा लागला होता म्हणून आता नगर जिल्ह्यातील कारखाने नियमानुसार भाव देतात की नाही यावर ती आपली भूमिका ठरवणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत असलेल्या या परिषदेची शेतकऱ्यांसाठी योग्य भूमिका असल्यामुळे शेतकरी वर्गाचा यावेळेस पाठिंबा असल्यामुळे ही शेतकरी परिषद होणार यात शंका नाही
दरम्यान एक रकमी एफ आर पी हा आमचा अधिकार असून मागील वर्षाची एफ आर पी एक रकमी अधिक तीनशे रुपये घेणारच असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले
अहमदनगर जिल्ह्यातील कोणकोणते कारखाने नियमानुसार शेतकऱ्यांच्या उसाला भाव देणार यावर खासदार राजू शेट्टी हे आपली भूमिका या भव्य ऊस परिषदेत मांडण्याची शक्यता आहे
तरीपण आज दिनांक एक नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता टाकळीमिया येथील महादेव मंदिरात या ऊस परिषदेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले आहे
0 टिप्पण्या