टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आश्रमशाळा ढवळपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त,निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद देत तब्बल ४५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमधे सहभाग नोंदविला होता.विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, संविधान प्रत तसेच बक्षीस देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.माध्यमिक आश्रमशाळा ढवळपुरीचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे,पारनेर तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड, तालुका सचिव बाबाजी वाघमारे, कार्याध्यक्ष संजय मोरे, खजिनदार संजय कोरडे,पत्रकार पोपट पायमोडे, संभाजी वाळुंज, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, धोंडीभाऊ ठोकळ, पप्पू पोपळघट, मिनीनाथ शेळके व आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरवातीला मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामधे शहिद झालेल्या विरांना सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी मान्यवर पाहुण्यांचे हस्ते शाळेच्या प्रांगणात असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व
महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे म्हणाले, जगातील मजबुत संविधान हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली मोठी देणगी आहे.याच संविधानाच्या जोरावर भारत आज जगाच्या पाठीवर महासत्ता बनत आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व्हावा याच उद्देशाचे देशामधे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणुन साजरा करतात.बाबासाहेबांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी व संविधानाचे महत्व समजण्या साठीच देशभर संविधानदिन साजरा केला जातो.संस्थेचे संस्थापक व आमचे मार्गदर्शक डाॅ.काझी यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असुन, स्व.डाॅ. काझीसर व मुख्याध्यापक स्व. टकलेसर यांनी केलेल्या कार्याचे स्मरण आज होत असल्याचे दत्ता गाडगे म्हणाले.
तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड म्हणाले की, संविधान लेखन करीत असताना बाबासाहेबांनी अनेक देशातील राज्यघटनांचा अभ्यास करुन भारताचे संविधान तयार केले.कार्याध्यक्ष संजय मोरे म्हणाले, भारतीय लोकशाही जगात टिकून राहण्याचे कारण म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना होय.
यावेळी अध्यक्षस्थाना वरुन बोलताना मुख्याध्यापक बापुसाहेब रुपनर, म्हणाले, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथील विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून आज घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.तालुका,जिल्हा व राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमधे ढवळपुरी आश्रमशाळेचे विद्यार्थी चमकतात हे फार मोठे यश आहे.
आज संविधान दिनानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी झांजपथकाच्या गजरामधे प्रभात फेरी काढून संविधानाबद्दल गावामधे जनजागृती केली.
चौकट :
विद्यालयाची विद्यार्थीनी कु.योगिता वाव्हळ हिने केलेले खुमासदार भाषण व छोटा चिमुकला दर्शन जाधव याने सादर केलेल्या लोकगीताने मान्यवरांची मने जिंकली.
निबंध स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे :
इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम - अभिषेक सुरेश खताळ
द्वितीय - अनुष्का धोंडीबा वाळुंज
तृतीय - संग्राम देविदास फलके
उत्तेजनार्थ -१) प्रगती धोंडीबा ठोकळ २)प्रांजल वसंत थोरात
३)श्रृतिका मिनिनाथ शेळके
४)मनिष शंकर साळवे
इयत्ता ८ वी ते १० वी :
प्रथम - आकांक्षा दिनेश जाधव
द्वितीय - प्रविण सुभाष कारंडे
तृतीय - वैष्णवी राजेंद्र रूपनर
इयत्ता ११ वी ते १२ वी :
प्रथम - वैष्णवी कैलास बलमे
द्वितीय - ऋतुजा दाजीबा वाघ
तृतीय - प्रतिक्षा बाबासाहेब बुचुडे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार लतिफ राजे यांनी,सुत्रसंचालन राजाराम वाघ यांनी केले तर,आभार महेंद्र वाबळे यांनी मानले.
0 टिप्पण्या