पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

व्हॉटसअ‍ॅप मेसेजमुळे खळबळ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कट रचल्याचा व्हॉटसअ‍ॅप मेसेज मुंबई पोलिसांना आला असून त्यामुळे. त्यामुळे खळबळ उडाली आहे, मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे व्हॉटसअ‍ॅप मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे, मोदींना यापूर्वीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनाही धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीचा तपास सुरू केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या