पारनेर : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने " राष्ट्रीय योग वीर सन्मान - २०२२" चे आयोजन करण्यात आले आहे. ९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील लाजपत भवन सभागृहामधे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय कार्यक्रमाची जोरदार तयारी करत आहे या कार्यक्रमामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.या कार्यक्रमा मधे पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील योगशिक्षक साहेबराव केरु भगत यांचीही योगवीर पुरस्कारा साठी निवड झाली आहे. कार्यक्रमामधे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू मंगेश त्रिवेदी, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा 'टेनी', केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ.
मजपारा,महेंद्रभाई कालूभाई, गृहनिर्माण व नगरविकास मंत्री किशोरजी, मोरारजी देसाई, राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक डॉ. ईश्वर व्ही. बसवरेड्डी यांना आमंत्रित करण्यातआले आहे.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने कोविड काळात इम्युनिटी बूस्टर ऑनलाइन योगाभ्यास कार्यक्रम, ५१ लाख सूर्यनमस्कार कार्यक्रम, ७१ लाख सामूहिक सूर्यनमस्कार सराव कार्यक्रम, २१ लाख शालेय मुलांसह ७५ लाख लोकांना हृदयविकार टाळण्यासाठी योगाभ्यास कार्यक्रम. सर्व योगासने विविध उपक्रमात प्रशंसनीय योगदान देणाऱ्या शिक्षक, महासंघाचे विविध अधिकारी आणि मार्गदर्शक मंडळे यांना राष्ट्रीय योग वीर सन्मान - २०२२ ने सन्मानित करण्यात येणार आहे.पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील योगशिक्षक साहेबराव भगत वीस वर्षापासून युवक क्षेत्रात योगदान पतंजली हरिद्वार योगपीठ मध्ये प्राथमिक शिक्षण व योगाभ्यास करून अष्टांग योगा विषयी शिक्षण संपादन क रून पारनेर येथे पारनेरसह नगर जिल्ह्यामधे गेली १० वर्षापासून अनेक गावांमधे निशुल्क योग शिबिर वेगवेगळ्या गावात घेतले वआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ५१ लाख सूर्यनमस्कार या कार्यक्रमात भाग घेतला पंतप्रधान वाढदिवसा निमित्त ७२ लाख लोगों को योगाभ्यास करायला या कार्यक्रमात भाग घेतला कोरोना काळात फुफुसाचे आरोग्य कसे वाढेलयोग शिबिराचे आयोजन केलेध्यान धारणा योग मुद्रा प्राणायाम योगासने करून लोकांचे आजार दूर करण्याचे पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे अखिल भारतीय युवक शिक्षक महासंघ यांच्या वतीने दिल्लीमध्ये योगविरांचा सन्मान या कार्यक्रमामधे पुरस्कारार्थींमधे नगर जिल्ह्यामधुन पारनेर तालुक्यातील योगशिक्षक साहेबराव केरु भगत यांची निवड झाली आहे.त्यांनी पारनेरसह नगर जिल्ह्यामधे योगशिक्षणा साठी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या या योगशिक्षणामधील स्पृहनिय योगदाना बद्दल त्यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय योग वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या