राहुल गांधींनी मोदींना संबोधलं PayPM. नांदेड - नोटाबंदीला 6 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2-3 अब्जाधीश मित्रांना फायदा व्हावा यासाठी हे काम करण्यात आल्याचं राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी मोदींना PayPM म्हणून संबोधलं. 

विरोधी पक्षांनी नोटाबंदीला आर्थिक नरसंहार आणि गुन्हेगारी कृत्य म्हणून संबोधले होते. राहुल गांधी ट्विट करून म्हणाले की, नोटाबंदी हे पेपीएमने त्यांच्या २-३ अब्जाधीश मित्रांना लघु आणि मध्यम व्यवसायांचे उच्चाटन करून भारताच्या अर्थव्यवस्थेवर मक्तेदारी निर्माण करावी यासाठी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल होते. यावेळी राहुल यांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

याआधी राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "काळा पैसा आला नाही, फक्त गरिबी आली, अर्थव्यवस्था कॅशलेस झाली नाही, ती कमजोर झाली. दहशतवाद नव्हे, कोट्यवधींचे छोटे उद्योग आणि रोजगार गेले, नोटाबंदीत '५० दिवस' देण्याचे आश्वासन देऊन अर्थव्यवस्थेचेच डिमोलिशन केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या