आरोग्य शिबिरे घेणे हिच वाढदिवसाची संकल्पना असेल-विजयराव औटी

 


शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांच्या वाढदिवसाबद्दल शिबिराचे आयोजन..

पारनेर : पारनेर तालुक्यातील निघोज अळकुटी जिल्हापरीषद गटामधे बुधराणी हाॅस्पीटल पुणे व डाॅ.भास्कर शिरोळे प्रतिष्ठाणचे वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीराचे निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयामधे आयोजन केले होते.शिवसेनेचे अहमदनगर जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या वाढदिवसानिमीत्त या शिबिराचे आयोजन केले होते.मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य विधानसभेचे मा.उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजीमहाराज व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबिराचे उध्दाटण झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हापरीषदेचे बांधकाम व कृषी समीतीचे सभापती काशिनाथ दातेसर हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विजयराव औटी बोलत होते.यावेळी बोलताना औटी म्हणाले,सध्या आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाची घडी पुर्णपणे विस्कटलेली आहे. ती जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण राजकारणातून निवृत्त होणार नाही असे विजयराव औटी म्हणाले.तसेच काही लोक वाढदिवस कसे करतात,त्यामधे कायकाय करतात हे न बोललेच बरे.पण शिवसेनेची कामाची पध्दत वेगळी आहे.आरोग्य शिबिरे घेणे हिच आपली वाढदिवसाची संकल्पना  असल्याचे मत औटींनी व्यक्त केले.शिवसेनेच्या स्थापनेपासुन सेनने मुंबई येथे आरोग्य शिबिरे घेउन मराठी माणसाची जिवापाड सेवा केली.  हाच उपक्रम पुढे नेत शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर घेउन चांगले सामाजिक काम केले त्याला उस्फुर्थ असा प्रतिसाद लाभला आहे.त्याच पध्दतीने आज मा.पं.स. सदस्य डॉ.भास्कर शिरोळे यांनी निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर घेतले आहे.



सध्या तालुक्याची परस्थीती अतिषय बिकट आहे.आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात आपण काय केले काय नाही केले याची कल्पना जनतेसमोर आहे.तालुक्याची विस्कटलेली घडी जो पर्यंत व्यवस्थीत बसत नाही तो पर्यंत आपण निवृत्त होणार नाही असेही विजयराव औटी म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांचा वाढदिवसा निमीत्त सत्कार करण्यात आला.शिबिराचा तब्बल ३५० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे,माजी पंचायत समिती सदस्य डॉ.भास्करराव शिरोळे,शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, बाजार समितीचे माजी उप सभापती बबुशा वरखडे,शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, निघोज सोसायटीचे मा.चेअरमन बाळासाहेब लामखडे,मा. उपसरपंच उमेश सोनवणे, निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गट महिला आघाडी प्रमुख पायल पांढरकर, निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटाचे प्रमुख बाबाजी तनपुरे,संजय मते,संजय ठुबे,रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर,निवृत्ती महाराज तनपुरे,अर्जुन वराळ, प्रविण चौधरी, प्रकाश पांढरकर आदीसह ग्रामस्थ व उपस्थित होते.शिबीर यशस्वी करण्या साठी शिवसैनिकांनी विशेष असे परिश्रम घेतले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी तनपुरे यांनी केले.तर आभार विशाल घोलप यांनी मानले.



छाया : दत्ता गाडगे

निघोज येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरामधे मार्गदर्शन करताना राज्य विधानसभेचे मा.उपाध्यक्ष विजयराव औटी व उपस्थित जनसमुदाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या