इतिहासात पहिल्यांदा शंभर रू स्टॅम्पवर विकासाचा जाहीरनामा जाहीर

 


---

भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा आदर्श गावचा आदर्श जाहीरनामा : वर्षा नवले यांचे एक पाऊल विकासाच्या दिशेने

---------------

भेंडा वृत्तसेवा

-------

भेंडा :  नेवासा तालुक्यातील भेंडे खुर्द येथील ग्रामपंचायत  निवडणूक चांगलीच शिंगेला पोहचली आहे.  येत्या १८ डिसेबर रोजी मतदान होत असताना या निवडणूकीत भैरवनाथ  ग्राम विकास पॅनलने आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर मतदारांसाठी विकासाचा आदर्श जाहीरनामा आगळ्यावेगळ्या स्वरूपात जाहीर केला आहे. आता या जाहीरनाम्याची गावात, तालुक्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 



 गावाचा जाहिरनामा हा सरपंच पदासाठी उभे असलेले वर्षा वैभव नवले यांनी वार्ड क्रमांक एकमधील अशोक गवाजी चौधरी,  सिंधू चिमाजी गजरे, सुवर्णा आदिनाथ नवले, वार्ड क्रमांक दोन मध्ये सागर सोपान महापूर, प्रतिक्षा विजय धनवडे, शिलाबाई दत्तात्रय नवले, तिसऱ्या वार्डमध्ये   सुदीप सुनील खरात, सुवर्णा सतीश नवले, संतोष जालिंदर महापूर यांच्यावतीने जाहीर केला आहे. यात "भेंडा खुर्दच्या विकासासाठी एक पाऊल" ........ असा मुद्दा उपस्थित करून मतदारांना विकासाचे आश्वासन देताना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 


"तर आम्ही कोण आहोत"   या शीर्षकाखाली  

भेंडा खुर्द गावाला एका विकासाच्या टप्यावर नेण्यासाठी घेतलेल्या ध्येयाने प्रेरित झालेले सुशिक्षित नागरिक आहोत. ग्रामपंचायत व रहिवाशांमध्ये उत्तम समन्वय राखून सामाजिक बांधिलकीद्वारे लोकाभिमुख विकास साधणे या एकमेव उद्देशाने निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलची स्थापना करण्यात आली आहे.


आम्हाला विश्वास आहे :

जेव्हा नागरिक आणि निर्वाचित लोकप्रतिनिधी कार्यशीलनेने काम करतील तेव्हा भेंडा खुर्दकरांना सर्वोत्तम सेवा दिली जाईल. सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सामाजिक बांधिलकी लोकाभिमुख विकास व पारदर्शक कारभार उदाहरणाद्वारे व विश्वासाने अंमलात आणतील.  


"आम्ही वचनबद्ध आहोत".....या मुद्यामध्ये गावातील प्रत्येक वार्डात सिमेंट कॉंक्रेट किंवा डांबरी रस्ते,  संपूर्ण गावात घर तिथे नळ योजना राबविणार, गावातील गरजू व्यक्तीना घरकुल उपलब्ध करून देणे. जागा नसल्यास ती उपलब्ध करून देणे. विजेची बचत करण्यासाठी गाव सौर उर्जेखाली आणणे. नागरिकांना वेळेवर रेशन मिळवून देणे. आधुनिक शाळा, क्रीडा संकुल, विविध मंदिराला निधी आणून उभारणी करणे.  सार्वजनिक शौचालय, नागरिकांना कमी खर्चातील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे असे विकासाचे जवळपास २१ घटकांचा पाच वर्षात विकास करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या