मोफत प्रवेश मोफत प्रवेश राष्ट्र सह्याद्री आयोजित शॉपिंग महोत्सवासाठी मोफत प्रवेश

 

31 डिसेंबरच्या डिजे नाईटसाठीच 100 रुपये प्रवेश मूल्य

श्रीरामपूर ः राष्ट्र सह्याद्रीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजि


त केलेल्या तीन दिवशीय शॉपिंग महोत्सवाचे उद्या (गुरुवारी) उदघाटन होत आहे. शापिंग महोत्सावासाठी कोणतेही प्रवेशमूल्य नाही. सर्वांना येथेे मोफत प्रवेश असणार आहे. या शॉपिंग महोत्सवाचा नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले व कार्यकारी संपादक पुनम नवले यांनी केले आहे. 

आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व फतवा फेम अभिनेत्री श्रद्धा भगत यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता खा. गोविंदराव आदिक सभागृहात या शॉपिंग महोत्सावाचे उदघाटन होणार आहे.

फक्त डिजे नाईटसाठीच प्रवेशमूल्य

शॉपिंग महोत्सवानिमित्त 31 डिसेबरला होणार्‍या डिजे नाईटसाठी मात्र 100 रुपयांचे प्रवेशमूल्य आकारण्यात येणार आहे. या नाईटमध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांना 100 रुपयांचा एन्ट्री पास घ्यावा लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या