9 ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

निवडणुका लांबणीवर पडल्याने गावपुढाऱ्यांचा हिरमोड 

बेलापूर : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे रणधुमाळी सुरूवात झाली असताना गावपातळीवर मोर्चेबांधणीला चांगलीच गाव पुढाऱ्यांनी कंबर कसली होती.मात्र एकंदरीत गावपातळीचे राजकीय वातावरण तापू लागले होते. असे असताना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे पत्र काढले आहेत. तसे आदेश श्रीरामपूर गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी अंनत परदेशी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सुत्रे हाती घेण्याची सुचना केली आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.या निवडणुका तीन ते चार महिने लांबल्यास ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अनेक विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडण्याची शक्यता आहे. 


ग्रामपंचायती आणि प्रशासकाची नावे 
शिरसगाव - यु.डी.शेख ( कृषी अधिकारी ) 
उक्कलगाव- डी. एस. मेहेरे ( विस्ताराधिकारी, कृषी)
निमगाव खैरी- आर. डी. अंभग ( विस्ताराधिकारी पंचायत समिती)
भोकर - ए. बी. पावसे ( विस्ताराधिकारी कृषी)  
फत्त्याबाद-  एस. बी. तोडमल ( विस्ताराधिकारी कृषी) 
खिर्डी - यु. के. कासार ( अंगणवाडी पर्यवेक्षिका)  
कान्हेगाव- एम. जी. राजळे (अंगणवाडी पर्यवेक्षिका)
गुजरवाडी- पी. बी. बडाख ( अंगणवाडी पर्यवेक्षिका) 
माळवाडगाव- एन. डी. गोराडे (शाखा अभियंता) या 9 ग्रामपंचायतीची जानेवारी 2023 मध्ये मुदत संपल्याने शासनाच्या आदेशाने प्रशासक नियुक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या