सासवड येथे कोण होणार सभापती?

 जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आज गुरुवारी आयोजन


--------

 सासवड :  सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक व आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार सभापती या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन आज गुरुवार 12 रोजी करण्यात आले आहे. 

या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्षआहे. खुल्या गटासाठी होणाऱ्या स्पर्धेत पुरंदर हवेलीतील 18 वर्षापुढील महाविद्यालयीन युवक-युवती, शेती, सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील व्यावसायिक तसेच कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. यासाठी पन्नास रुपये नाममात्र प्रवेश फी असून प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य राहील सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात गुरुवारी 12 सकाळी दहा वाजता ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

गुरुवारी तारीख 12 सकाळी 10 वाजता आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी स्पर्धा झाल्यावर बक्षीस वितरण होईल स्पर्धेसाठी दोन फेऱ्या राहणार असून पहिल्या फेरीसाठी ५+२ मिनिटांची अवधी राहील. त्यासाठी 'पुरंदर काल ,आज आणि उद्या," नोकरी की व्यवसाय, ऐतिहासिक वास्तू सुशोभीकरण की विद्रोपीकरण, वधू- वर अपेक्षा की समस्या पारंपारिक सण की सणांचे पाश्चतीकरण आणि आज शिवराय असते तर' हे विषय राहणार आहे .तर दुसऱ्या फेरीसाठी ३+२मिनिटांची अवधी असून पहिल्या 10 स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. 

यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्यावर सभापती किताब व फिरता करंडक प्रशस्तीपत्रक व रोख सात हजाराचे बशीस देण्यात येणार आहे .द्वितीय, तृतीय  क्रमांकासाठी अनुक्रमे पाच हजार ,तीन हजार ,दोन हजार ,आणि एक हजार रोख , ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असल्याचे रवींद्र पंत जगताप यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 94 0515 94 49 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या