'सुपर राउंडर' सायकल क्लबच्या आठ सदस्यांनी पटकावला पुरस्कारशेवगाव प्रतिनिधी

सायकलिंग क्षेत्रातील सर्वात मानाचा  समजला जाणारा पुरस्कार सुपर राउंडर हा अ.नगर जिल्ह्यात प्रथम एकाच वेळेस मिळवण्याचा मान शेवगाव सायकल क्लब च्या आठ सदस्यांनी पटकावला आहे. प्रथम 200 कि.मी.,300 कि.मी, 600की.मी.,400की.मी.असे 1500 की.मी. बीआरएमचे आव्हान पूर्ण करून हा सन्मान मिळवला आहे. संपूर्ण शेवगावकारासाठी हा एक अभिमानाचा विषय आहे. यामुळे शेवगाव तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठे झाले आहे. शेवगाव मध्ये प्रथम एसआर होण्याचा मान सचिन मुळे यांनी मागील वर्षी मिळवला आहे, त्या नंतर "शेवगाव सायकल क्लब" चे सदस्य एकाच वेळेस एवढ्या मोठया संख्येने एसआर झालेत. असे "शेवगाव सायकल क्लब" संतोष काकडे (तहसीलदार अमरावती) यांनी सुध्दा  मागील वर्षी SR होण्याचा बहुमान मिळवला आहे.

 बहुमान मिळवणारे सायकलिस्ट 
डॉ. प्रदीप उगले, डॉ. स्मिता उगले, डॉ.मुकुंद दारकुंडे, बंडू दहातोंडे, पो.हे.को.संजय बडे, निळकंठ लबडे, आबासाहेब नेमाने, पवार (पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या