श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी





सासवड :


श्री क्षेत्र वीर येथे आज शनिवार दि :२१ रोजी पौष अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. 

यात्रा पूर्वीची अमावस्या असल्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा पोस्टर, बॅनर व पत्रिका, देवस्थानची दिनदर्शिका वाटप कार्यक्रम करण्यात आला. यात्रेची पूर्वतयारी चालू असल्यामुळे मंदिर व्यवस्थापनामार्फत परिसरातील सर्व डागडूजी पार्किंगची व्यवस्था, यात्रा काळातील नियोजन, मंदिराची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता या गोष्टी प्राधान्याने चालू असल्याचे चेअरमन श्री संतोष धुमाळ यांनी सांगितले.

     कोरोना नंतरची पहिली यात्रा पाहता यावेळेस गर्दीचे सर्व उच्चांक मोडीस निघण्याची शक्यता असून त्या दृष्टिकोनातून नियोजन चालू असल्याचे सांगितले अभिजीत धुमाळ सचिव यांनी सांगितले. पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मि. गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. समस्त पान व्यापारी व श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न ग्रुप यांनी भाविकांना  महाप्रसादचे आयोजन केले होते. 

देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, सॅनिटायझर, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस, इ. चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे व्हा. चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्थ हनुमंत धुमाळ (बाबुकाका), अमोल धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे, राजेंद्र कुरपड इ. मंडळींनी ट्रस्ट तर्फे व्यवस्था पहिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या