गावठी कट्यासह आरोपी जेरबंद : पोलीसांची धडाकेबाज कामगिरी


श्रीरामपूर :
गावठी कट्टा हातात घेऊन दहशत करणाऱ्या ७ गुन्हे दाखल असलेला सर्राइत आरोपी रईस याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी कट्यासह पकडून त्याला अटक केली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि. २२/०१/२०२३ रोजी रात्री ११/०० वा चे सुमारास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खंडाळा एम.आय.डी.सी. मध्ये काळे डेअरीचे जवळ एक इसम हातात गावठी कट्टा घेवुन दहशत करत आहे. अशी माहिती मिळताच पोनि हर्षवर्धन गवळी यांनी सपोनि बोरसे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपुर शहर पोस्टे तपास पथक रवाना केले. बातमीप्रमाणे तपास पथक गेले असता, एक इसम पळुन जावु लागला, त्याचा पाठलाग करुन त्याचेजवळ प्राणघातक हत्यार असल्याची जाणीव असतानाही त्यास तपास पथकाने धाडसाने त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याचे जवळ एक ४०,०००/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा व १,०००/- रू किंमतीचे दोन जिवंत काडतुस मिळुन आली आहेत. सदर आरोपीस त्याची ओळख विचारता त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव रईस शेरखान पठाण, वय ३० वर्षे, रा. रांझणखोल, ता. राहाता, जि.नगर असे सांगितले. सदर आरोपीविरुद्ध लागलीच गुन्हा रजि. नं. ८०/२०२३ आर्म ॲक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस ३ दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

 सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे, पोउनि सुरेखा देवरे, पो.ना. साईनाथ राशिनकर, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.ना. मच्छिंद्र शेलार, पो.कॉ. गौतम लगड, पो. कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो. कॉ. मच्छिंद्र कातखडे, पो. कॉ. गौरव दुर्गुळे, पो.कॉ. तुषार गायकवाड, पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ, पो. कॉ. ज्ञानेश्वर गुंजाळ, पो.कॉ. आंबादास आंधळे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पो.ना. फुरकान शेख व पो.कॉ. प्रमोद जाधव यांनी केली. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि सुरेखा देवरे या करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या