सासवड शहरात अतिक्रमणावर कारवाईसासवड (प्रतिनिधी) : सासवड नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते ,सासवड नगर परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणे ,तसेच वाहतुकीस अडथळा करणारे बांधकामे ,ओटे, पायरी,गटारी,नाली यावरील बांधकामे हे तातडीने अतिक्रमण मुक्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे .ही कारवाई पुढे चार दिवस सुरू राहणार आहे .


सर्व नागरिकांनी स्वत :अतिक्रमण काढून नगर परिषदेत सहकार्य करावे असे आव्हान सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे. अतिक्रमणे काढण्यासाठी 24 तासाची मुदत देखील दिली होती सासवड शहरातील पारगाव रोड जेजुरी नाका ,जेजुरी रस्ता, बाबू लोहार शेजारील परिसर व इतर परिसरामध्ये कारवाई करण्यात आली. जेजुरी नाक्यावरील अतिक्रमणे काढली असून या जागेवर सासवड नगर परिषदेचे आरक्षण आहे हे विकसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनंत भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले ,पोलीस निरीक्षक आणासो घोलप ,पोलीस कर्मचारी ,तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी/ कर्मचारी ,सासवड नगर परिषदेचे नगर रचनाकार सुमित काशीद, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण ,अभियंता धोंडीराम भगनुरे, अभियंता रामानंद कळसकर, कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे, करनिरीक्षक उत्तम सुतार आदींनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या