मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातील सहकारी साखर कारखानदारी आणि त्यांच्या समोरील अडचणी संदर्भात आज राज्यातील प्रमुख नेत्यांची चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. डॉ. सुजय विखे पाटील, पंकजाताई मुंडे यांच्यासह सहकाराची संबंधित नेते या बैठकीला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. याचाच विचार करुन अमित शहा यांनी आज सहकार क्षेत्रासी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली. सहकार क्षेत्राशी संबंधित हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, अभिमन्यू पवार, धनंजय महाडिक यावेळी उपस्थित होते.
राज्यपालांच्या निवृत्तीबद्दल उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांनी यापूर्वीही निवृत्तीबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळात आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी सुपारी दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलतांना मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचंही सूतोवाच केलं आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी अनेक नेते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने काहींनी जाहीरपणे नाराजीदेखील बोलून दाखवली होती.
0 टिप्पण्या