सनातन संस्कृती सन्मानार्थ राष्ट्र धर्म मिरवणूक

वैजापूर : प्रजासत्ताक दिनाचे दिवशी येथील श्रीमद भागवत कथा कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवार(ता,२६)रोजी देशाच्या तिन्ही दलांच्या स्थलदल, वायूदल, व नाविक दल, सैनिकांच्या व देशाच्या सन्मानार्थ ,व सनातन धर्म,संस्कृती सन्मानार्थ शहरात भव्य व दिमाखदार राष्ट्रधर्म  मिरवणूक  तिरंगा ध्वज फडकवीत काढण्यात आली. या मिरवणुकीत स्वतः परमपूज्य शांतिदुत व धर्मरत्न देवकीनंदन ठाकुरजी महाराज सहभागी झाले होते. भारतीय सैनिकांचे मनोबल उंचवावे यासाठी

प्रजासत्ताक दिनी ही धर्म व राष्ट्र निष्ठेची मिरवणूक जीवनगंगा या वसाहतीपासून संकट मोचन मंदिर पर्यंत काढण्यात आली. यात शहरातील पांच ते सात हजार स्त्री-पुरुष, तरुण ,छोटी मुले सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या