अहमदनगर महाविद्यालयात दोन गटात राडा
नगर : मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेली घटना ताजी असतांनाच आज गुरुवारी (दि. 19) रोजी पुन्हा अहमदनगर महाविद्यालयात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नगर शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी दोन गटामध्ये तुफान राडा झाला. यात झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी दुपारी अहमदनगर महाविद्यालयात शुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान हाणामार्‍या झाल्या.
दोन गटात झालेल्या हाणामार्‍या नेमकं कोणत्या कारणावरुन झाल्या याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच राडा करणार्‍यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरु होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या