महाराष्ट्र दिव्यांग खेळाडूंचा दिल्लीत डंका


 नगर (प्रतिनिधी)- 
पाचव्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या कामगिरीची छाप सोडली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी तब्बल 20 सुवर्ण, 18 रौप्य आणि 7 कास्य पदक पटकाविले. नुकतेच दोन दिवसीय एटीटीएफच्या वतीने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे ही स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील विविध राज्यांच्या दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील दिव्यांग खेळाडू मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या संघात एकूण 26 दिव्यांग खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंनी एकानंतर एक सुवर्ण पदकाची कमाई करुन दिल्लीत सुवर्ण इतिहास रचला.
पाचव्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व विजेत्या खेळाडूंना एशियन चॅम्पियन खेळाडू (सन 1992) डॉ. सुनीता गोदारा यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. विजय खेळाडूंची कंबोडिया या देशात होणार्‍या पॅरालिम्पिक गेम साठी निवड झाली आहे. सदर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूना एटीटीएफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुहास मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तर अतुल धनवडे यांनी टीम मॅनेजरचे काम पाहिले. नारायण मडके, प्रशांत सावंत यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या