पाच निरक्षरांना शिकवणे सक्तीचे
त्यासाठी नवीन साक्षरता अभियान तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान पाच निरक्षर लोकांना शिकवणे आवश्यक असेल. यासाठी, त्यांना क्रेडिट स्कोअर देखील मिळेल, जो त्यांच्या अभ्यासक्रमात जोडला जाईल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक सत्रापासूनच नवीन साक्षरता योजना लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी सविस्तर गाईड लाईनही (मार्गदर्शक तत्वे) जारी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये प्रत्येक कोर्सचे प्रोजेक्ट वर्क आणि असाईनमेंट त्याच्याशी जोडण्यास सांगितले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असेल.
या योजनेंतर्गत निरक्षरांना शिकवण्यासाठी पाच क्रेडिट स्कोअर मिळेल. तथापि, हा क्रेडिट स्कोअर तेव्हाच मिळेल जेव्हा शिकणाऱ्याला साक्षर असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात आणि राज्य सरकारच्यावतीने काही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
यूजीसीच्या मते, या उपक्रमामुळे साक्षरता मोहिमेला गती मिळेल. सध्या देशातील साक्षरतेचे प्रमाण सुमारे 78 टक्के आहे. यासह सुरू झालेल्या नवीन मोहिमेत ते 100 टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, यूजीसीने निरक्षर लोकांना शिकवण्यासाठी विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याबाबतही सुचवले आहे जेणेकरून ही मोहीम अधिक चांगल्या पद्धतीने राबवता येईल.
तज्ज्ञांच्या मते, या उपक्रमामागे विद्यार्थ्यांवर अभ्यासासोबतच काही जबाबदारी देण्याचे सरकारचे मत आहे. यातून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडून घेण्याची चांगली संधीही मिळेल. दरम्यान, सध्या देशात एक हजाराहून अधिक विद्यापीठे आणि सुमारे 45 हजार महाविद्यालये आहेत.
0 टिप्पण्या