मुबंई : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात. यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी बुधवारी अनेक राजकीय पक्षांना पत्र लिहिले आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 30 जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभासाठी 21 समविचारी पक्षांच्या अध्यक्षांना आमंत्रित करणारे पत्र लिहिले आहे. यात टीएमसी, जेडीयू, शिवसेना, टीडीपी, राष्ट्रवादी, एनसी, समाजवादी पक्ष, बीएसपी, डीएमके, सीपीआय, सीपीएम, जेएमएम, आरजेडी, आरएलएसपीसह आणखी सात पक्षांचा समावेश आहे.
त्यांनी लिहिले की, या कार्यक्रमात द्वेष आणि हिंसाचाराशी लढण्यासाठी, सत्य, करुणा आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी. तसेच स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि सर्वांसाठी न्याय या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्या देशावरच्या या संकटाच्या काळात, जिथे लोकांचे लक्ष सार्वजनिक प्रश्नांवरून पद्धतशीरपणे वळवले जात आहे, तिथे ही यात्रा एक शक्तिशाली आवाज म्हणून उदयास आली आहे. मला आशा आहे की, तुम्ही त्यात सामील व्हाल आणि याच्या संदेशाला आणखी मजबूत कराल.
0 टिप्पण्या