सहकारी संस्था काढणे सोपे, चालवणे अवघड : आ.निलेश लंके

 


पारनेर : प्रतिनिधी  


 तालुक्याची दुबई म्हणुन प्रसिध्द असलेल्या निघोज गावामधे महागणपती को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि.या संस्थेच्या निघोज शाखेचा शुभारंभ पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भिमाशंकर सह.साखर कारखाना आंबेगांवचे व्हाॅईस चेअरमन प्रदिप वळसेपाटील हे होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले,सध्याच्या युगामधे बँका,सहकारी संस्था चालविणे म्हणजे काटेरी खुर्ची वर बसण्यासारखे आहे. माझ्या ताब्यात जर १ हजार कोटींची पतसंस्था दिली तर वसुल होणे शक्य नाही. मग काहीही शिल्लक राहणार नाही. कारण हे काम माझ्या सारख्याला जमणे शक्यच नाही. ज्याचे काम त्यानेच करु जाणे असे सांगीतले.संस्था काढणे सोपे आहे पण त्या चालविणे फार अवघड असते.सख्या भावाचे कर्ज थकले तरी प्रसंगी कारवाई करावीच लागते. निघोजला शरद सहकारी बँकेसह निघोज ग्रामिण,मळगंगा पतसंस्था भैरवनाथ पतसंस्थेसह लहानमोठ्या १२ ते १५ सहकारी संस्था आहेत.स्पर्धा मोठी आहे.महागणपती संस्था हे नांव गणपतीचे,आज अंगारक चतुर्थी हा योगा चांगला जुळुन आलाय. म्हणुन आता महागणपती संस्थासुध्दा चांगली चालेल असा विश्वास व्यक्त केला.
   अध्यक्ष स्थानावरुन बोलताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन  प्रदीप वळसेपाटील म्हणाले, संस्था उभी राहताना कारभारी मंडळाचा विश्वास पाहीला जातो. निघोजमधील अनेक सहकारी संस्था आपली शरद सहकारी बँक यामुळे येथे स्पर्धा मोठी आहे. निघोजचे अनेक लोक व्यापारासाठी कुलाब्यामधे आहेत. या परीसरात बागायती शेती असुन,ऊस क्षेत्र मोठे आहे.पैसा भरपूर आहे पण लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित कसा राहील,चांगला व्याजदर कसा देता येईल,होतकरु शेतकर्‍याला सहज कर्ज कसे उपलब्ध होईल.यासाठी संस्थेचा कारभार चोख पाहीजे.संस्थेला संस्थाचालकांनी काचेच्या भांड्याप्रमाणे जपत ग्राहकांचा विश्वास संपादन करावा.
   सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष संजय भालेकर, संचालक पवन हगवणे, राजेंद्र हुले, महेश शिंदे, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष ठकाराम लंके, मळगंगा कन्स्ट्रक्शनचे अमृता रसाळ, मा.प्राचार्य हभप रामचंद्र सुपेकर,चांदा गावडे,दत्ता पवार,संदिप वराळ,खंडु घुले, अर्जुन वराळ,दिलीप ढवण, युवानेते रुपेश ढवण , प्रसिद्ध व्यापारी दत्ताञय चौधरी, पत्रकार व संस्थेचे सल्लागार सुरेश खोसे पाटील , गोरख लामखडे , अरुण लंके , दत्ता नरवडे,मुख्य समन्वया शोभना टिकेकर,अंजनी नरसाळे,योगेश थोरात आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या